भुकेल्यांसाठी माणुसकीचा घास: ‘परिषद की रसोई’ १४६ दिवसांपासून नातेवाईकांच्या सेवेत

बिकट स्थितीतही दाखल रुग्णांच्या दोनशे नातेवाइकांना (Meals for two hundred relatives) दररोज माणुसकीचा घास भरविण्याचे सेवाकार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (the Government Medical College) १४६ दिवसांपासून (Service for 146 days) अविरत केले जात आहे.

    यवतमाळ (Yavatmal). कोरोनाच्या (coronavirus) भीतीने बाधितांसह नातेवाइकांना शेजारी व जवळच्या व्यक्तींकडून (neighbors and close ones) आवश्यक ती मदत वेळेवर मिळाली नसल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र, अशा बिकट स्थितीतही दाखल रुग्णांच्या दोनशे नातेवाइकांना (Meals for two hundred relatives) दररोज माणुसकीचा घास भरविण्याचे सेवाकार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (the Government Medical College) १४६ दिवसांपासून (Service for 146 days) अविरत केले जात आहे.

    दीड वर्षांपासून कोरोनाने जगात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या विषाणूने आतापर्यंत असंख्य जणांचे आई-वडील, मुले-मुली, सून, जावई, नातवंडे अशी जवळची व्यक्ती हिरावून नेली आहेत. त्यातून अनेक चिमुकले व वयाने ज्येष्ठ असलेली व्यक्ती पोरके व निराधार झाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातच तब्बल २१७ बालकांनी या कोरोनात पालकांना गमावले आहे. एकूण १६२ मुलांनी वडील गमावले असून, ५१ मुलांनी आई गमावली आहे. तर चार मुलांनी आई व वडील या दोघांनाही गमावले आहे. अशी भयावह परिस्थिती कोरोनाने निर्माण केली आहे.

    अशा बिकट स्थितीत उपचारार्थ दाखल आपल्या जवळच्या व्यक्तींच्या काळजीत यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयाबाहेर राहणाऱ्या गरजूंना जेवण व मानसिक आधार देण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते १४६ दिवसांपासून अविरत करीत आहेत. विद्यार्थी परिषद व माधुरी पद्माकर महाजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून ही निःशुल्क सेवा कोरोनाच्या नियमांचे पालन करीत केली जात आहे.

    सरकारी रुग्णालयाबाहेरील नातेवाइकांची जेवणाअभावी गैरसोय होत असल्याचे लक्षात आल्यावर निःशुल्क भोजन देण्याचे सुरू केले. रस्त्यांवरील गरजू व गृहविलगिकरण असलेल्या कुटुंबांनाही जेवणासह मेडिकल, नॉन मेडिकल सुविधाही घरपोच देत आहोत. ज्या परिवारातील सर्वच जण रुग्णालयात आहेत अशा जवळपास ५० घरांचे मोफत सॅनिटाईस आतापर्यंत केले. गरज लक्षात घेता ३० जूनपर्यंत हे सेवाकार्य सुरू राहणार आहे.
    — डॉ. मनोज पांडे, अध्यक्ष, माधुरी पद्माकर महाजन सेवाभावी संस्था, यवतमाळ