१८ लाखांचा गुटखा पकडला; अन्न सुरक्षा विभागाची कारवाई

अवैधरीत्या गुटख्याच्या तस्करी करणाऱ्या आयशर वाहनावर अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली. यामध्ये १८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई ३० मार्चला करण्यात आली.

    आर्णी (Arni).  अवैधरीत्या गुटख्याच्या तस्करी करणाऱ्या आयशर वाहनावर अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली. यामध्ये १८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई ३० मार्चला करण्यात आली.

    प्राप्त माहितीनुसार, जवळ्यावरून लोणीमार्गे दारव्हाकडे एका आयसरमध्ये गुटखा नेल्या जात असल्याची गोपनिय माहिती अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून गोपाल माहोरे व जी.पी. धांदे यांनी सहकार्यासोबत सापळा रचून गाडी अडविली व झडती घेतली असता अवैध घुटखा व सुगंधित तंबाखू मिळून आला.

    वाहन क्र. एमएच 29 टी 3355 टाटा आयशर कि 500000 असा एकूण 1,823,000 चा मुद्देमाल जप्त करून विविध कलमान्वे 5 जनाविरोधात गुन्हे दाखल करून जप्त केलेला अवैध मुद्देमाल व आयसर गाडी आर्णी पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात दिली आहे.