दिलीप बिल्डकॉनचे नागपूर – तुळजापुर मार्गावर अवैध उत्खणन

  • खड्यात साचलेल्या पाण्यात तरुण बुडाला
  • जवळा येथे मासेमारी करतांना घटना, एनडीआरएफ तर्फे शोध सुरु

यवतमाळ/आर्णी: (Yavatmal/ Arni)  तालुक्यातील जवळा परिसरात दिलिप बिल्डकॉनने गौण खनिजासाठी खोदून ठेवलेल्या खड्डयांनी तळ्याचे स्वरूप घेतले आहे. अशातच आपल्या वडीलांसोबत ‘त्या’ तळ्यामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाला अचानक फिट आल्याने तो बुडाला. ही दुर्घटना आज २७ सप्टेंबरला सकाळी आर्णी तालुक्यातील जवळा येथे घडली.

किशोर अशोक नाने (३२) असे तळ्यात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. नागपुर-तुळजापुर महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. यासाठी दिलीप बिल्डकॉन या रस्ता बांधकाम कंपनीने ठिकठिकाणी गौण खनिजासाठी मोठमोठे खड्डे खोदले आहे. हे खड्डे तळ्याच्या आकाराचे झाले आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने या तळ्यामध्ये अनेक गावात मासेमारीसुध्दा केली जात आहे. अशातच जवळा येथिल किशोर हा आपले वडील अशोक यांच्यासोबत २७ सप्टेंबरला सकाळी दत्त टेकडी परिसरात असलेल्या गौण खनिजासाठी खोदून असलेल्या खड्डयांतील तळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेला होता. थर्माकोलच्या बोटीवर बसून किशोर मासे पकडत होता. अशात किशोरला अचानक फिट आली.

तो बोटीवरून खाली पडून पाण्यात बुडू लागला. वडिलांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान दुपारी चार वाजेपर्यंत गावातील काही तरुण आणी वडीलांनीच मुलाला शोधण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर यवतमाळ येथील एनडीआरएफचे शोधपथक जवळा येथे दाखल झाले त्यांनी बोटीद्वारे किशोरचा शोध घेणे सुरु केले आहे. मात्र सायंकाळी उशीरा पर्यंत त्याचा शोध लागला नाही. अधिक तपास जवळा पोलिस चौकीचे जमादार अरुण चव्हाण व पी, सी, देवानंद मुनेश्वर करीत आहे.