यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरारातील गौण खनिजांच्या अवैध उत्खननाचा जिवंत पुरावा
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरारातील गौण खनिजांच्या अवैध उत्खननाचा जिवंत पुरावा

दारव्हा शहरालगत बागवाडी ग्रामीण क्षेत्रात मोठ्या ईगल कंटरक्षण कंपनी कडून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरु आहे. सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवुन हे ऊत्खनन सुरु असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत.तथापी महसूल प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही.

  • महसूल प्रशासनाची मूकसंमती; करोडो रुपयांच्या महसूलाचा चुराडा

शैलेश डहाके
दारव्हा (Darvya). दारव्हा शहरालगत बागवाडी ग्रामीण क्षेत्रात मोठ्या ईगल कंटरक्षण कंपनी कडून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरु आहे. सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवुन हे ऊत्खनन सुरु असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत.तथापी महसूल प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही.

ऊत्खननाच्या रात्रभर सुरु असलेल्या अनिर्बंध आवाजामुळे परीसरातील लोकांच्या झोपेचा खोळंबा झालेला आहे. धूर प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालेला आहे. कुठल्याही खदानक्षेत्राचे सिमांकन प्रत्यक्ष स्थळी आढळून येत नाही.
सिमाबाह्य क्षेत्रात ऊत्खनन होत असतांना महसूल प्रशासनाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे तक्रारकर्त्यांचे मत आहे. विहीत परीमाणापेक्षा अधिक खोदकाम करण्यात येत असल्याने या क्षेत्रात तलावसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. या अगोदर ही ईगल कंटरक्षण कंपनी ला तहसिलदार यांनी १ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता परंतु आज पर्यंत ही कंपनी ने दंड भरलेला नसून पुन्हा गौण खनिजाचे अवैध उत्खनन चालूच आहे.

या प्रकाराची महसुल प्रशासनाकडून वेळीच दखल घेतल्या न गेल्यास गंभीर परिणामास सामोरे जावे लागणार आहे. स्थानिक नागरीक ह्या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचे मानसिकतेत आहेत. महसुल विभागाने रात्री दरम्यान ह्या परिसरालगत रहिवासी क्षेत्रात दौरा करुन ह्या प्रकरणाची गंभिरता समजुन कार्यवाही करावी अशी तक्रारकर्त्यांची मागणी आहे.