कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन; कोविड रुग्णांना स्वतंत्र विलगीकरण कक्ष मिळणार

वाढती कोविड-19 रुग्णसंख्या हे सगळ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शहराठिकाणचे रूग्णालय व कोविड कक्ष भरलेले आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील कोविड रूग्णांसाठी याभागातच कोविड विलगीकरण कक्ष व्हावे यासाठी बाभूळगाव तालुक्यातील पहुर ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकवर्गणीद्वारे विलगीकरण कक्षाची निर्मीती करण्यात आली.

    बाभूळगाव (Babhulgaon).  वाढती कोविड-19 रुग्णसंख्या हे सगळ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शहराठिकाणचे रूग्णालय व कोविड कक्ष भरलेले आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील कोविड रूग्णांसाठी याभागातच कोविड विलगीकरण कक्ष व्हावे यासाठी बाभूळगाव तालुक्यातील पहुर ग्रामस्थांनी पुढाकार घेत लोकवर्गणीद्वारे विलगीकरण कक्षाची निर्मीती करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन 23 एप्रिल रोजी बाभूळगाचे तहसीलदार विठ्ठल कुंभरे यांनी केले आहे.

    सर्वत्र कोरोना व्हायरसने हाहाकार माजविला असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. वाढती कोविड रूगणसख्या आरोग्य यंत्रणेवर तान देणारी ठरत आहे. रूग्णाना योग्यठिकाणी व योग्यवेळी उपचार मिळावे व कोविड रुग्णांना स्वतंत्र विलगीकरण कक्ष मिळणार असावे व शासनाला याकार्यात हातभार लागावे या हेतूने पहुर ग्रामस्थानी पुढाकार घेत लोकसहभागातून कोविड विलगीकरण कक्षाची उभारणी काल शुक्रवारी 23 एप्रिलला केली आहे.

    यावेळी बाभूळगाव पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर, पं.स. गटविकास अधिकारी राजेंद्र घोंगडे, आरोग्य अधिकारी मनिष साऊळकर, ग्राम पंचायत सरपंचा लताताई पुराम, पोलीस पाटील जयस्वाल, व ग्रामस्थ राजेंद्र चुके, पिंटू होटे, नितीन श्रीनाथ, राजेंद्र पत्रे, अनिल तुप्पट, ज्ञानेश्वर खोचे, राजेंद्र कोवे, नरेंद्र मोहतुरे, पवन हजारे, गजानन अजमिरे, दिनेश गव्हाळ, प्रभाकर उखरे, विजय पत्रे, संजय मानकर, सुरेश कोडापे आदींची उपस्थिती होती.

    पहुर हे गाव ग्रामिण भागात लोकसंख्येने गोठे असल्याने लोकवर्गणीद्वारे उभारण्यात आलेले विलगीकरणकक्ष हे कोविड रूग्णाना दिलासादायक ठरणार आहे. तालुक्यातील मोठ्या गावात असे स्वतंत्र लोकवर्गणीद्वारे विलगीकरण कक्ष उभारण्यात यावे अशी मागणी होत आहे.