घाटंजी तालुक्यात महसूल व पोलीस विभागाची रेती चोरावर संयुक्त कारवाई

घाटंजी (Ghatanji). दिवसेंदिवस रेती चोरी करनारे नवनवीन रेतीचोर सक्रीय होत आहेत. तसेच कारवाई दरम्यान अधिकारी/ कर्मचारी यांच्यावर हल्ले करणे‌ तसेच मुजोरी करण्याच्या घटना घडत असतांना अवैध रेती उपसा व वाहतूक करना-यांवर महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

घाटंजी तालूक्यात अवैधपणे रेती वाहतूक करना-या वाहनांवर महसूल विभागाची नियमीत नजर आहे परंतू महसूल विभागातील कारवाई करना-या पथकांवर रेती चोर दिवस रात्र पाळत ठेवून राहत असल्याने अडचणी निर्माण होतात. परंतू अवैध रेती उपसा व वाहतूकीला आळा घालण्याकरीता महसूल व पोलीस विभागाकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.

पथक गस्तीवर आज गस्तीवर असताना वाहन क्रमांक MH29 BE2192 हे वाहन अवैधरीत्या रेतीचा उपसा करून वाहतूक करीत असतांना डांगरगाव शिवारात निदर्शनास येताच पथकामार्फत कारवाई करण्यात आली. या प्रकारच्या संयुक्त कारवाईमुळे तालूक्यातील रेतीचोरट्यांचे चांगलेच धाबे दनानले आहे. या कारवाईत तहसिलदार पुजा माटोडे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, मंडळ अधिकारी विरेंद्र सोळंके, निलेश कूंभलकर‌ होते.