करंजी ग्रामपंचायतीत ३५ वर्षे जुन्या सत्तेविरुद्ध अविश्वास ठराव पारित

पांढरकवडा पंचायत समिती  अंतर्गत करंजी रोड ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच विरुद्ध परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने सरपंच सुनीता आत्राम व उपसरपंच लक्ष्मण राठोड यांचा विरुद्ध नव सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावा संबंधी  तहसीलदार सुरेश  कव्हाळे केळापूर यांच्या उपस्थितीत प्रशासकीय नियमानुसार 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता  सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे सरपंच  सुनीता आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास सभेला ११ पैकी ११ सदस्य हजर होते.

करंजी रोड (Karanji Road).  पांढरकवडा पंचायत समिती  अंतर्गत करंजी रोड ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच विरुद्ध परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने सरपंच सुनीता आत्राम व उपसरपंच लक्ष्मण राठोड यांचा विरुद्ध नव सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावा संबंधी  तहसीलदार सुरेश  कव्हाळे केळापूर यांच्या उपस्थितीत प्रशासकीय नियमानुसार 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता  सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे सरपंच  सुनीता आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास सभेला ११ पैकी ११ सदस्य हजर होते.

सभेत अविश्वासवाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. प्रस्तावावर हात वर करून मतदान प्रक्रिया पार पडली. सरपंचच्या व उपसरपंच 9 सदस्यांनी  अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने ठराव मंजूर करण्यात आला. करंजी ग्रामपंचायत वर पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष रमेश मानकर  त्यांच्या शुनूषा  महिला बालकल्याण सभापती त्यांचे  चिरंजीव निमिष मानकर अर्थ व बांधकाम सभापती विध्यमान जिल्हा परिषद सदस्य अशा महत्वपूर्ण राजकीय प्रवास सुरु असताना बदलत्या राजकीय घडामोडीत मागील 35 वर्षा पासून अविरत झेंडा करंजी ग्रामपंचायत व सहकार क्षेत्रात प्रस्त  गाजवीत असतांना सत्ता गमावण्याची वेळ  विद्यमान जिल्हा परिषद सदस्य निमिष मानकर यांच्यावर आली.