मारेगाव तलाठी कार्यालय, जिल्हा यवतमाळ
मारेगाव तलाठी कार्यालय, जिल्हा यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील तलाठी कार्यालय बांधून एक वर्षाचा कालावधी झाला. तरीही या कार्यालयाचे अजूनही हस्तांतरण झालेले नसून या कार्यालयात असुविधाच दिसून येत असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

मारेगाव (Maregaon).  यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील तलाठी कार्यालय बांधून एक वर्षाचा कालावधी झाला. तरीही या कार्यालयाचे अजूनही हस्तांतरण झालेले नसून या कार्यालयात असुविधाच दिसून येत असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

अनेक गावांमध्ये बांधकाम विभागामार्फत तलाठी कार्यालय बांधण्यात आले. यामध्ये विजेपासून ते बोअरवेल मारून त्यामध्ये मोटर टाकण्याचे कामसुद्धा या ठेकेदारकडे होते; परंतु या कार्यालयाचे बांधकाम आटोपून एक वर्षाच्या वर कालावधी उलटून गेला तरी या कार्यालयाचे उर्वरीत काम अजूनपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही. ज्या ठिकाणी काम झाले त्याठिकाणी अजूनही त्या कामाचे व बांधकामाचे हस्तांतरण वर्षे लोटली तरीही करण्यात न आल्याने या कामाविषयी व संबंधीत विभागाविषयी कमालीचा रोष निर्माण होत आहे.

मारेगाव तहसील कार्यालयातील काही वस्तूंची तुटताट सुरू झाली असून काही कार्यालयातील खिडक्या तुटत आहेत तर काही ठिकाणांहून बॅटरीसुद्धा चोरी गेलेल्या आहेत. हे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले तरीही ठेकेदारावर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहेत.