बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरागडावर वनमंत्री संजय राठोड यांच्या शासकीय दौऱ्याचं आज आयोजन करण्यात आलंय. हा सरकारी दौरा असून सरकारी ताफ्यासह राठोड या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते माध्यमांसमोर काही बोलतात का आणि पूजा चव्हाण मृत्यूप्रकऱणी काय भूमिका घेतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टिक टॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वादाच्या घेऱ्यात सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड हे आज (मंगळवारी) १५ दिवसांनी पहिल्यांदाच समाजासमोर आले आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणानंतर गायब असलेले राठोड नेमके आहेत तरी कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.
बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरागडावर वनमंत्री संजय राठोड यांच्या शासकीय दौऱ्याचं आज आयोजन करण्यात आलंय. हा सरकारी दौरा असून सरकारी ताफ्यासह राठोड या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते माध्यमांसमोर काही बोलतात का आणि पूजा चव्हाण मृत्यूप्रकऱणी काय भूमिका घेतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणानंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये राठोड यांचा आवाज असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. त्यानंतर ते गायब होते. पहिल्यांदाच ते जाहीर भूमिका घेण्याची शक्यता आहे.