दिव्यांग युवकाने चक्क झोपून अडवली आमदार संजय राठोडांची गाडी

यवतमाळ : शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या गाडी समोर एक युवक झोपल्याने खळबळ उडाली आहे. प्रलंबीत रस्त्याच्या कामासाठी गाडीसमोर झोपला असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी संजय रोठोड यांनी  याविषयी चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

    संजय राठोड (Sanjay Rathod) हे दिग्रस मतदारसंघाचे आमदार आहेत. दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले होते. त्यावेळी वैभव नगरमधील भास्कर वाघमारे हा दिव्यांग युवक राठोडांच्या भेटीसाठी आपली समस्या घेऊन आला होता. भेट न झाल्याने वाघमारे याने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी शासकीय विश्रामगृहातून बाहेर निघता वेळी अडवली. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

    पोलीसांनी भास्कर जाधव यांना उठवून आमदार संजय राठोड यांच्याकडे घेऊन गेले. या दरम्यान भास्कर वाघमारे याने एकदा वैभव नगर येथे भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.