Murtijapur to Yavatmal Shakuntala Express; Free travel to Vidarbha by train started by the British

भारतात सरकारचीच रेल्वेलाईन होती आणि आहे असा तुमचा समज असेल तर तो पूर्णपणे चूकीचा आहे. भारतात एका ठिकाणी अशी एक रेल्वेलाईन होती जी खाजगी होती. खाजगी रेल्वेलाईन असूनही गरीबांसाठी ती जीवनवाहिनी होती. या रेल्वेतून लोक विनातिकीटही प्रवास करायचे. 25 डिसेंबर 1903 रोजी सुरू झालेली शकुंतला रेल्वे(Murtijapur to Yavatmal Shakuntala Express) ही अनेक वर्ष वऱ्हाडवासीयांची जीवनरेखा होती.

    विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावर, क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनी या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली होती. वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोमठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, बोरी, लाडखेड, लिंगा, लासीना अशी 15 स्टेशने होती.

    क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनीने (पुढे तिचे नाव सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी (सीपीआरसी) असे झाले होते ) या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले, तेव्हा पुढील 100 वर्षे ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील, असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला गेला होता. त्यामुळे इ.स. 2003 पर्यंत या रेल्वेलाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. 1994 पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालत असे. 15 एप्रिल 1994 पासून गाडीला डिझेल इंजिन लागले. मात्र, तिच्या वेगात काहीही बदल झालेला नाही. अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी होती.