लसीकरण सेंटरवर तोबा गर्दी; नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याची भाजपा व्यापारी आघाडीची मागणी

शहरासह तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नव्या पत्रकानुसार आता खाजगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड-19 लसीकरण सुरू आहे.

    वणी (Wani).  शहरासह तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नव्या पत्रकानुसार आता खाजगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड-19 लसीकरण सुरू आहे. परंतु लसीकरण सेन्टर एकच असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे जनतेला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

    याबाबत भारतीय जनता पार्टी व व्यापारी आघाडीच्या वतीने आज 15 मार्चला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर यांच्या उपस्थित भाजपा शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष लवलेश लाल, सरचिटणीस संदीप मदान, उपाध्यक्ष रवी रेभे, सुधीर साळी, अनिल आकेवार, सचिव नितीन बिहारी, गुलशन खुराणा, आशीष जैन, कार्यकारिणी सदस्य राजू तिवारी, राहुल लाल, हितेन अटारा, अमोल वैद्य, लक्ष्मीनारायण लोया, दीपक जैन, रवी फेरवानी, होमेश पांडे, अनुप राठी, संतोष भेले, अवि दोडके, सुनील मत्ते, उज्ज्वल पांडे, कल्पेश पटेल, यश जोबनपुत्रा, उपस्थित होते.