विद्युत ताराच्या सापळ्यात अडकलेल्या बालकाला जीवाची बाजी लावून वाचविले

तो चिमुकला (Small Boy) नेहमीप्रमाणे घराजवळून जात होता; पण त्याला कुठे ठाऊक होते की, शेजारील विद्युत खांबावरील (nearby electric pole) जिवंत तार त्याच्या अंगावर पडेल आणि तो भाजला जाईल. जिवंत विद्युत तार (electric wire) अंगावर पडल्याने 6 वर्षीय बालक भाजल्या (burn) गेल्याची घटना महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावात घडली आहे.

    यवतमाळ (Yavatmal). तो चिमुकला (Small Boy) नेहमीप्रमाणे घराजवळून जात होता; पण त्याला कुठे ठाऊक होते की, शेजारील विद्युत खांबावरील (nearby electric pole) जिवंत तार त्याच्या अंगावर पडेल आणि तो भाजला जाईल. जिवंत विद्युत तार (electric wire) अंगावर पडल्याने 6 वर्षीय बालक भाजल्या (burn) गेल्याची घटना महागाव तालुक्यातील फुलसावंगी गावात घडली आहे.


    6 वर्षीय गजानन भोजने असे त्या बालकाचे नाव. तो मित्रांसोबत खेळत असताना अचानक 11 केव्हीची हाय व्होलटेज तार तुटली. गजानन जेथून जात होता त्या ठिकाणी पडली .याच ताराच्या तावडीत 6 वर्षीय गजानन सापडला; विजेचा जबर धक्का बसल्याने तो तडफडू लागला. डोळ्यादेखत हा प्रसंग पाहत असलेल्या काही जिगरबाज युवकांना राहावले गेले नाही.

    क्षणाचाही विलंब न करता ते गजाननच्या मदतीला धावून आले; पण दैव बलवत्तर तारांचा गुंडाळा झाला. तार गजाननच्या काही अंतरावरून आहे हे लक्षात येताच गावातील तरूणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गजाननला तारांच्या रिंगणातून ओढून बाहेर काढले. सुदैवाने इतक्या मोठ्या अपघातून गजानन बचावला. विजेचा धक्का बसल्याने गजानन खांद्यावर आणि हातावर जळल्याच्या जखमा झाल्या आहेत.