शरीरसुखाची मागणी केल्याचा अर्ज म्हणजे निव्वळ खोडसाळपणा, सही खोटी अन् पतीचे नावही खोटे, संजय राठोड यांना क्लिनचीट

माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शरीरसुखाची मागणी(Demand Of Sex) केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणात संजय राठोड यांना यवतमाळ पोलिसांनी क्लीनचीट(Clean Chit To Sanjay Rathod By yavatmal Police) दिलेली आहे.

    मुंबई :यवतमाळमधून(yavatmal) एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शरीरसुखाची मागणी(Demand Of Sex) केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणात संजय राठोड यांना यवतमाळ पोलिसांनी क्लीनचीट (Clean Chit To Sanjay Rathod By yavatmal Police) दिलेली आहे. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांना तसा तक्रारीचा अर्ज पाठवण्यात आला होता. मात्र या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात उल्लेख केलेल्या महिलेची नसल्याचे समोर आले आहे. महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असं पोलिसांनी सांगितले आहे.

    विशेष चौकशी पथकाने या प्रकरणात चौकशी केली. या चौकशीत असे आढळले की, माजीमंत्री संजय  राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठविलेला नाही. या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा अर्जामध्ये चुकीचे टाकले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय राठोड यांच्याविषयी  तक्रार नाही. कुणीतरी खोडसाळपणे स्पीडपोस्टाने हा तक्रार अर्ज महिलेच्या नावाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्जात नमुद केलेल्या महिलेचा व महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी संबंध नसल्याचे उघड झाले आहे.

    संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते.