संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत म्हणाले की…

संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी शुक्रवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केल्याचं वृत्त आहे.

    यवतमाळ : शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारही मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचं दिसून आलं. राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते.

    त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

    उदय सामंत यांनी शुक्रवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केल्याचं वृत्त आहे.

    तसेचं केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. परंतू काही केंद्रांवर लस उपलब्ध नसल्यानं नागरिकांना परत जावं लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यवतमाळला केंद्र सरकारने दिलेल्या 35 पैकी 14 व्हेंटिलेटर बंद पडले. केंद्राकडून लशीचा पाहिजे तसा पुरवठा होत नसल्यानं अशी परिस्थिती निर्माण होत आहे, अशी टीका देखील उदय सामंत यांनी केली आहे.

    दरम्यान, अतिशय गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीतून कष्ट करून मी मंत्री पदापर्यंत पोहोचलो, पण महाराष्ट्रातील अतिशय घाणेरड्या राजकारणामुळे मला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हे खूप दुर्दैवी आहे. असं मत संजय राठोड यांनी व्यक्त केलं होतं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.