संजय राठोड, शिवसेनेचे आमदार
संजय राठोड, शिवसेनेचे आमदार

टिक टॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वादाच्या घेऱ्यात सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड हे आज (मंगळवारी) १५ दिवसांनी पहिल्यांदाच मिडीयासमोर आले आहेत. शक्तीप्रदर्शनासाठी पोहरादेवीत त्यांच्या समर्थकांची तुफान गर्दी झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

    यवतमाळ : टिक टॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वादाच्या घेऱ्यात सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड हे आज (मंगळवारी) १५ दिवसांनी पहिल्यांदाच मिडीयासमोर आले आहेत. शक्तीप्रदर्शनासाठी पोहरादेवीत त्यांच्या समर्थकांची तुफान गर्दी झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

    मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास संजय राठोड यवतमाळमधून पोहरादेवीकडे सहकुटुंब रवाना झाले. यानंतर तासाभरात पोहरादेवीत पोहोचले. त्यांच्यासोबत शिवसेना नेते, पदाधिकारी आहेत. तब्बल १७ वाहनांच्या ताफ्यासह ते पोहरादेवीत आले आहेत.

    यावेळी मंदिर परिसरात हजारो लोक जमल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तीन तेरा वाजले. छतावर, रस्त्यावर जिकडे तिकडे तुफान गर्दी झाल्याने. राठोड यांच्या ताफ्याला पुढे जाण्यास वाट मिळत नव्हती. अखेरीस पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.