अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा; महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ठ काम करणाऱ्या समाज सेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सन 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19 व 2019-20 या वर्षांसाठी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर याकरिता पात्र समाजसेविका व सामाजिक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.

    यवतमाळ (Yavatmal).  महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ठ काम करणाऱ्या समाज सेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सन 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19 व 2019-20 या वर्षांसाठी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर याकरिता पात्र समाजसेविका व सामाजिक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.

    प्रस्तावासोबत अर्जदाराचे संक्षिप्त परिचय, नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, शैक्षणिक कागदपत्रे, महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ठ काम केल्याबाबत अनुभवाचे पुरावे, कात्रणे, पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र व इतर आवश्यक माहितीसह प्रस्ताव सादर करावयाचे आहे.

    तरी इच्छुक समाज सेविका व सामाजिक संस्था यांनी सात दिवसाचे आत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, यवतमाळ येथे दोन प्रतीत सादर करावे. उशिरा प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.