प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

महागाव तालुक्यातील अंबोडा येथे बोअरवेलमधून गरम पाणी येत असल्यामुळे पंचक्रोशीत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. येथील सेवानिवृत्त शिपाई महादेवराव सुखदेव भोयर यांच्या अंगणातील बोअरवेलमधून मागील तीन दिवसांपासून गरम पाणी येत आहे.

    यवतमाळ (Yavatmal). महागाव तालुक्यातील अंबोडा येथे बोअरवेलमधून गरम पाणी येत असल्यामुळे पंचक्रोशीत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. येथील सेवानिवृत्त शिपाई महादेवराव सुखदेव भोयर यांच्या अंगणातील बोअरवेलमधून मागील तीन दिवसांपासून गरम पाणी येत आहे. पाण्यात हात टाकला तर अक्षरशः चटका लागावा एवढे पाणी गरम आहे.

    माजी सरपंच हनवंतराव देशमुख यांनी याबाबत तहसीलदार नामदेव इसाळकर यांना माहिती दिली. तलाठी अर्चना बोंबले यांनी घटनास्थळी येऊन बोअरवेलला गरम पाणी येत असल्याची खातरजमा केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना दिला. रविवारी सकाळी मराठवाड्याला भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू महागाव तालुक्यातील साधूनगर येथे होता. अंबोडा हे गाव जवळ असल्याने भूकंपामुळे भूगर्भात झालेल्या घडामोडींमुळे बोअरवेलला गरम पाणी येत असल्याचा अंदाज नागरिक वर्तवित आहेत.