पुलाचा अंदाज न आल्याने नाल्याच्या पाण्यात बस उलटली; मृतांच्या नातेवाईकांना मिळणार १० लाखांची मदत

    यवतमाळ (Yavatmal) : उमरखेडजवळील (Umarkhed) दहागाव नाल्याच्या पुरात (flood in Dahagaon) बस उलटून दगावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या कुटुंबीयांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना ही मदत दिली जाईल. अपघातातून बचावलेल्यांच्या (Accident survivors) उपचाराचा खर्च दिला जाणार आहे. चालक व वाहका यांना एसटीच्या नियमाप्रमाणे भरपाई मिळणार, अशी माहिती विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी (Divisional Controller Srinivas Joshi) यांनी दिली.

    दरम्यान, या अपघातासाठी जबाबदार धरत चालक सुरेश सुरेवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाल्यावरून पाणी वाहत असतानाही चालक सुरेवार हे बस घेऊन गेले. पुलाचा अंदाज न आल्याने काठावर जात बस उटली. या अपघातात चालक, वाहक व इतर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. पुसद येथील इंदल रामप्रसाद महिंद्रे यांचाही यात समावेश होता. यांचा भाचा शरद फुलमाळी यांच्या तक्रारींवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.