पन्नास बेडचे डेडीकेटेड कोविड सेंटर दोन दिवसात जनतेच्या सेवेत येणार; आमदार उईकेंनी केली कोविड सेंटरची पाहणी

यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. यात ग्रामीण रुग्णालय राळेगाव समाविष्ट आहे. या प्लांटला ही मंजुरी मिळाली आहे. 27 एप्रिल मंगळवारला आमदार अशोक उईके यांनी राळेगाव येथे येऊन डेडिकेटेड कोविड सेंटर व ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली.

    राळेगांव (Ralegaon).  यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे, यात ग्रामीण रुग्णालय राळेगाव समाविष्ट आहे. या प्लांटला ही मंजुरी मिळाली आहे. 27 एप्रिल मंगळवारला आमदार अशोक उईके यांनी राळेगाव येथे येऊन डेडिकेटेड कोविड सेंटर व ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. या बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली़ पन्नास बेडचे डेडीकेटेड कोविड सेंटर येत्या दोन दिवसात जनतेच्या सेवेत असणार आहे, असे आमदार अशोक उईके यांनी सांगितले.

    संपूर्ण देशात कोविड-19 या साथ रोगाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात थैमान घातले आहे. याला आळा बसावा या दृष्टीने तालुका स्तरावरच आरोग्याच्या सुविधा पूर्ण करण्यासाठी राळेगाव मतदार संघाचे आमदार अशोक उईके यांनी उपविभागीय कार्यालयात सर्वपक्षीय सभेचे आयोजन केले होते. सर्वपक्षीय सभेत राळेगांव मतदार संघासाठी एक कोटी रुपयांचा निधी आरोग्याच्या सोई सुविधेसाठी देण्याचे जाहिर केले होते. त्या अनुषंगाने राळेगांव येथे ट्रामा केअर सेंटर मध्ये पन्नास बेडचे ऑक्सिजनच्या सोई सुविधेसह कोव्हिड सेंटर उभारण्याचे आश्वासन दिले़ यासाठी लागणारा निधी तातडीने वळता केला.

    सर्वपक्षीय सभेत दिलेले आश्वासन या निमित्याने पूर्ण झाले आहे. कोव्हिड सेंटर व ऑक्सिजन प्लँटचे राहिलेले काम त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या़ याच प्रमाणे आरोग्याच्या संदर्भात तालुक्यातील कुठल्याच गावातून तक्रार येणार नाही याची दक्षता सर्वांनी घेण्याचे सांगितले. यावेळेस आमदार अशोक उईके यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, वैदयकीय अधिकारी डॉ़ प्रकाश चिमनानी, तहसीलदार बदकी, डॉ़ कुणाल भोयर आदी उपस्थित होते.