पित्याच्या मृतदेहासमोर ‘त्याने’ हंबरडा फोडला अन्…. यवतमाळमधील धक्कादायक प्रकार

यवतमाळमधील वसंतराव शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिवंत कोरोना रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकाच्या सतर्कतेमुळे हा रुग्ण जिवंत असल्याचे निदर्शनास आले.

    यवतमाळ : यवतमाळमधील वसंतराव शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिवंत कोरोना रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकाच्या सतर्कतेमुळे हा रुग्ण जिवंत असल्याचे निदर्शनास आले.

    बाबुळगाव तालुक्यातील दिघी पुनर्वसन येथील देवेंद्र ज्ञानेश्वर कावणकर यांच्या वडिलांना ३० एप्रिल रोजी आजारपणामुळे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

    निमोनियाची लक्षणे व ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली. कोरोना रिपोर्ट प्रलंबित असतानाच त्यांची प्रकृती खालवल्याने डॉक्टरांनी त्यांना कोविड वार्डमध्ये दाखल करून घेतले. व तशी माहिती देखील कुटुंबियांना देण्यात आली. संबंधित रुग्ण हा रुग्णालयात ऑक्सिजन लावून उपचार घेत होता. येथील कर्मचाऱ्याने तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती देवेंद्र यांना दिली.
    त्यानंतर देवेंद्र हे मृत वडिलांचे शरीर पाहण्यासाठी गेले असता साक्षात त्यांचे वडील ऑक्सिजन लावून बेड वर उपचार घेत असल्याचे आढळून आले.

    या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर देवेंद्र यांनी हंबरडा फोडला असता त्यांच्या वडिलांनी अचानक डोळे उघडले.

    डॉक्टरांनी चुकीची माहिती दिल्यामुळे कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकारांचा निष्काळजीपणा पुढे आला असून यापूर्वी देखील असा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.