मुख्य रस्त्याला आठवडी बाजाराचे स्वरूप; कोरोना संसर्ग फैलावाची शक्यता

कोरोनाचा संसर्ग फैलाव अधिक होऊ नये म्हणून आठवडी बाजार शासनाने बंद केले. परंतु दर आठवड्याला गावातील मुख्य रस्त्याला बाजाराचे स्वरूप प्राप्त होत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    बाभूळगाव (Babhulgaon).  कोरोनाचा संसर्ग फैलाव अधिक होऊ नये म्हणून आठवडी बाजार शासनाने बंद केले. परंतु दर आठवड्याला गावातील मुख्य रस्त्याला बाजाराचे स्वरूप प्राप्त होत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    बाभूळगाव येथील आठवडी बाजार गुरुवारला भरतो. आठवडी बाजार वाढत्या कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आला आहे. या आठवडी बाजारात राळेगाव,कळंब, यवतमाळ, धामणगाव येथील ठोक व चिल्लर व्यापारी भाजीपाला व धान्याचे दुकान लावत होते. परंतू आठवडी बाजार बंद असल्याने बाहेरगावतील भाजीपाला, धान्याचे, व्यापाऱ्यांनी प.स. ते इंदिरा चौकात रोडच्या दुतर्फा दुकाने लावतात़.

    भाजीपाला व इतर दुकाने व भाजीपाला घेण्यासाठी येणारे ग्राहकांची गर्दीमुळे बाभूळगाव मेन लाईला आठवडी बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले, परंतु वाहतुकीची कोंडीही वाढली आहे. तसेच कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या होणाऱ्या गर्दीमुळे व्यापारी कोरोनाच्या संसर्गामुळे धास्तावले आहे. येथील नगरपंचायतने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.