The selection of the state Village Interest project for the this World Challenge in the United States nrat
The selection of the state Village Interest project for the this World Challenge in the United States nrat

शेतमाल विक्रीत (sale of agricultural commodities) शेतकऱ्यांचे शोषण (the exploitation of farmers) थांबवून बाजार व्यवस्था सुलभ करणाऱ्या 'ग्रामहित'ची अमेरिकेतील 'सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सॉल्वर चॅलेंज-२०२१'साठी (Cisco Global Problem Solver Challenge 2021) निवड झाली आहे.

    यवतमाळ (Yavatmal). शेतमाल विक्रीत (sale of agricultural commodities) शेतकऱ्यांचे शोषण (the exploitation of farmers) थांबवून बाजार व्यवस्था सुलभ करणाऱ्या ‘ग्रामहित’ची अमेरिकेतील ‘सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सॉल्वर चॅलेंज-२०२१’साठी (Cisco Global Problem Solver Challenge 2021) निवड झाली आहे. जगभरातील ४२ प्रकल्पांमध्ये (42 projects) महाराष्ट्रातील हे एकमेव आहे.

    पंकज व श्वेता महल्ले यांचा हा प्रकल्प. पंकज यांनी यवतमाळ येथील सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयातून बीएसडब्ल्यू तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथून एमएसडब्ल्यू पूर्ण केले. टाटाच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत जमशेदपूरमध्ये उच्चपदावर काम केले. श्वेता यांनी आयआयटी हैदराबादमधून बीई केले. दोघेही उच्चशिक्षित असल्याने बड्या पगाराची नोकरी असल्याने आयुष्य सुकर झाले. पण, यवतमाळातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या.

    तोट्याच्या शेतीमुळे कर्ज वाढल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करतात ही सल बोचू लागली. ही परिस्थिती बदलण्याचा चंग या उच्चशिक्षित दाम्पत्याने बांधला. दोघांनीही नोकरी सोडून दोन वर्षांपासून ‘ग्रामहित’ हा शेतकऱ्यांचा हिताचा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली.

    ग्रामहित प्रायव्हेट लिमिटेड कंपनीही स्थापन केली. या माध्यमातून शेतीतील समस्या शोधल्या. सुरुवातीलाच त्यांनी रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याचे लक्षात आले. अनेकदा आर्थिक अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना बेभाव माल विकावा लागतो. म्हणून शेतमाल विक्री व्यवस्थेत शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी मोबाइलच्या माध्यमातून बाजार व्यवस्था सुलभ व विश्वसनीय करण्याचा प्रयत्न केला.

    शेतमाल विपणन अर्थव्यवस्थेतील हे प्रभावी मॉडेल गेल्या वर्षभरापासून वरुड, सावळी सदोबा आणि कळंब येथे प्रत्यक्ष वापरण्यात येत आहे. हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला आहे. या अभिनव कल्पनेसाठी ‘ग्रामहित’ची निवड ग्लोबल चॅलेंजसाठी करण्यात आली. जगभरातील १७५० कंपन्यांनी यासाठी अर्ज दाखल केले. यातून ४२ प्रकल्प निवडण्यात आले. ‘ग्रामहित’ हे भारतातील तीन प्रकल्पांमधील एक आहे.