यवतमाळ  जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील बसस्थानक जवळील नवनिर्मित रोडची दुर्दशा
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील बसस्थानक जवळील नवनिर्मित रोडची दुर्दशा

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील बसस्थानकवर जनतेच्या मागणीतुन व आमदार राजेंद्र नजरधने यांच्या प्रयत्नातुन येथे जवळपास ३० कोटी रुपयांचा निधी खर्च करून ७०० मीटर सी सी रोड चौपदरीकरण करण्याचे काम मागील दिड ते दोन वर्षापासून सुरू आहे, हे काम आज रोजी पूर्ण झाले हि नाही तर या रोडवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी वरचा सिमेंट चा थर पावसाने वाहून जाऊन गिट्टी उघडी पडली आहे,या सर्व प्रकारा वरून रोडचा दर्जा कसा असेल हे लक्षात येते.

गणेश भोयर
महागाव (Mahagaon). यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील बसस्थानकवर जनतेच्या मागणीतुन व आमदार राजेंद्र नजरधने यांच्या प्रयत्नातुन येथे जवळपास ३० कोटी रुपयांचा निधी खर्च करून ७०० मीटर सी सी रोड चौपदरीकरण करण्याचे काम मागील दिड ते दोन वर्षापासून सुरू आहे, हे काम आज रोजी पूर्ण झाले हि नाही तर या रोडवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी वरचा सिमेंट चा थर पावसाने वाहून जाऊन गिट्टी उघडी पडली आहे,या सर्व प्रकारा वरून रोडचा दर्जा कसा असेल हे लक्षात येते.

ज्या ठेकेदाराला या कामाचे कंत्राट मिळाले आहे त्याने अर्धे काम दुसऱ्या कंत्राटदाराला तोडुन देऊन कामाचा दर्जा सुमार खराब केला आहे. या संपूर्ण रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा पासून संपूर्ण जिल्ह्यात रेती च्या एकाही घाटाचा लिलाव झाला नाही हे वास्तव असतांना हि या ३० कोटीच्या सी सी रोडवर जी रेती वापरली जात आहे ती संपूर्ण रेती ही फुलसावंगी च्या जवळपास च्या नाले, पैनगंगा नदी वरच्या घाटावर पर्यावरण विभागाने रेती उपसयासाठी प्रतिबंधीत केले असतांनासुद्धा त्याच घाटावरन हजारो ब्रास रेती या कामावर वापरली जात आहे त्यातही माती मिश्रीत रेती वापरून कामाचा दर्जा सुमार खालावला गेला आहे.

या रस्त्याच्या बांधकामात सर्वच तांत्रिक मापदंडाला ठेकेदार कडून “कोळदंडा” दिला गेला असतांना ही शासनाने नेमून दिलेल्या अभियंत्याने मात्र या कामाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून एवढया मोठ्या निधीच्या कामावर पाणी फिरवून या पुसदच्या बड्या ठेकेदाराला पाठीशी घालून एक प्रकारे शासनाच्या निधीवर पाणी फिरविले असल्याचे बोलण्यास वावगे ठरणार नाही.

या रोडला लागणाऱ्या हजारो ब्रास रेती विनापरवानगी वापरली जात असतांना महसूल विभागाकडून या रेतीच्या ढिगाऱ्या बद्दल ब्र शब्द ठेकेदाराला विचारपूस करण्यासाठी वेळ मिळाला नसल्याने महसूल विभाग ही या रेती चोरी मध्ये अप्रत्यक्ष सहभागी असल्याचे म्हणयला काही हरकत नाही.