पत्नीने प्रियकरासोबत केला प्रेमविवाह, पतीने केले अस काही…

रंगराव आणि त्याची पत्नी मुलांसह यवतमाळमधील चाणीमध्ये राहत होते. रंगराव आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वादाचे खटके उडत असायचे आणि भांडणही होत होती. या सर्वाला कंटाळून पत्नीने पती रंगरावला सोडून दिले. तिने प्रियकर गणेश टेकाम वय ३४ याच्यासोबत लग्न केले. गणेशसोबत लग्न केल्यानंतर पत्नी मुलांसह गणेशच्या घरी राहू लागली.

यवतमाळ : पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करुन राहत असल्याने पहिल्या पतीचा राग अनावर झाला. त्यामुळे पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना यवतमाळ मध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी मुख्य आरोपी पतीस अटक केली आहे. 

पहिल्या पतीचे नाव रंगराव घोटेकर वय ३४ असे आहे. रंगराव आणि त्याची पत्नी मुलांसह यवतमाळमधील चाणीमध्ये राहत होते. रंगराव आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वादाचे खटके उडत असायचे आणि भांडणही होत होती. या सर्वाला कंटाळून पत्नीने पती रंगरावला सोडून दिले. तिने प्रियकर गणेश टेकाम वय ३४ याच्यासोबत लग्न केले. गणेशसोबत लग्न केल्यानंतर पत्नी मुलांसह गणेशच्या घरी राहू लागली. 

परंतु आपली पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत राहत असल्याचा रंगरावला राग आला. त्याला राग अनावर झाल्याने थेट पत्नीचे घर गाठले आणि गणेशला बेदम मारहाण केली. मारहाणी दरम्यान पत्नी भांडण सोडवण्यास गेल्याने तिला जिवे मारण्याची धमकी रंगरावने दिली. प्रचंड मारहाण केल्यानंतर गणेश हालचाल करत नसल्याने रंगरावाने घटनास्थळावरुव धूम ठोकली. पत्नीने तात्काळ पोलीस स्थानक गाठून पोलीसांना घटनेची माहिती दिली. 

पोलीसांना माहिती मिळाल्यावर घटनास्थळी रवाना झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपी रंगरावला अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तसेच अधिक तपास करत असल्याचे सांगितले आहे.