bhavna gawli image

शिवसेना खासदार भावना गवळी(Ed Raid On Bhavna Gawli`s Educational Institute) यांच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. या कारवाईनंतर खासदार भावना गवळी यांनी प्रतिक्रिया(Reaction Of Bhavna Gawli) दिली आहे.

    यवतमाळ (Yavatmal)वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी(Ed Raid On Bhavna Gawli`s Educational Institute) यांच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. या कारवाईनंतर खासदार भावना गवळी यांनी प्रतिक्रिया(Reaction) दिली आहे.  ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याचं गवळी यांनी सांगितलं आहे. तसेच भाजपा आमदारावर ईडी लावणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आज ईडीकडून भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांमधील कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचं पथक यवतमाळमध्ये दाखल झालं आहे. शिक्षण संस्थांमध्ये चौकशीही सुरु आहे.

    भावना गवळी म्हणाल्या की,“मला ईडीची कोणतीही नोटीस आलेली नाही. संस्थांवर ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहेत.  शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. माझ्या संस्थेचा एफआयर मी स्वत: नोंदवला होता. मला तो हिशोब मिळाला नाही म्हणून मी तक्रार दाखल केली. त्यातलं एकच वाक्य पकडायचं आणि त्यातला एकच आकडा घ्यायचा आणि ट्विट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा. असा काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी खेळ मांडलेला आहे. माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे. तिथे ग्रामीण भागातील मुलं शिक्षण घेत आहेत. गेल्या २० वर्षांपासून विद्या देण्याचं काम त्या ठिकाणाहून होत आहे. मी पाचवेळा या भागातून खासदार झाली आहे. कदाचित काही लोकांना ते चांगलं दिसत नाही.”

    “भाजपाचे एक आमदार या भागातील आहेत. ते भूमाफिया आहेत. त्यांनीही ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. केंद्र सरकार त्यांचीही ईडी चौकशी लावणार का? असा प्रश्न भावना गवळी यांनी विचारला आहे.