शुभांगी मेरे
१८ वर्षीय अफगाणिस्तानचा अल्लाह गझनफर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर पडला आहे. फ्रॅक्चरमुळे तो ही स्पर्धा खेळू शकणार नाही.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो ही स्पर्धा खेळू शकणार नाही.
भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने बुमराहच्या फिटनेसबद्दल अपडेट दिले आहेत.
ऑस्ट्रेलियन संघाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स देखील चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग असणार नाही, दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अँरिक नोर्किया २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याला संघात समाविष्ट करण्यात आले होते परंतु पाठीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला.
मिचेल स्टार्क देखील २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली की स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे.
युवा पाकिस्तानी सलामीवीर सैम अयुबला घोट्याच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी निवडण्यात आलेल्या १५ जणांच्या संघात निवडण्यात आलेली नाही.
२१ वर्षीय जेकब बेथेललाही २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर काढण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला दुखापत झाली होती.
ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणार नाही, तो कंबरेला झालेल्या दुखापतीने त्रस्त आहे.