WhatsApp वर आवाजासह Animated Stickers! स्वतःचे मजेदार स्टिकर्स कसे तयार कराल?

Pradnya Nikam

WhatsApp स्टिकर्स आता आवाजासह!

फक्त अँनिमेशन नाही, तर त्यासोबत तुमचा आवाजही! WhatsApp च्या Sound Stickers फीचरमुळे चॅटिंग होणार आणखी मजेदार.

WhatsApp | Pinterest

काय आहेत Sound Stickers?

Sound Sticker म्हणजे अॅनिमेटेड स्टिकरसोबत जोडलेला ऑडिओ. एखादा मजेदार व्हिडिओ, आवाज किंवा साउंड इफेक्ट स्टिकरमध्ये जोडून मित्रांना पाठवता येतो.

WhatsApp | Pinterest

स्वतःचा आवाजही जोडता येणार!

या फीचरमध्ये स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून स्टिकरला जोडण्याचा पर्याय मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या आवाजातील मजेदार प्रतिक्रिया किंवा खास संवाद स्टिकरच्या माध्यमातून शेअर करता येतील.

WhatsApp | Pinterest

व्हिडिओमधून तयार होणार Animated Sticker!

फोनच्या गॅलरीमधील व्हिडिओ निवडल्यानंतर WhatsApp त्यापासून अॅनिमेटेड स्टिकर तयार करू शकते. त्यानंतर त्याला आवाज जोडण्याचा पर्याय मिळतो.

WhatsApp | Pinterest

आवाज जोडण्याचे अनेक पर्याय!

स्टिकर तयार करताना व्हिडिओमधील मूळ आवाज ठेवता येतो. याशिवाय उपलब्ध साउंड इफेक्ट, फोनमधील ऑडिओ फाइल किंवा स्वतःचे व्हॉइस रेकॉर्डिंग वापरता येऊ शकते.

WhatsApp | Pinterest

कसे तयार करायचे Sound Sticker?

WhatsApp चॅट उघडा आणि Sticker सेक्शनमध्ये जा. Create Sticker पर्याय निवडा. गॅलरीमधील व्हिडिओ निवडल्यानंतर स्टिकर एडिटरमध्ये Audio पर्याय शोधा.

WhatsApp | Pinterest

आवाज निवडा आणि स्टिकर पाठवा!

Audio पर्यायातून हवा तो आवाज निवडा किंवा स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा. स्टिकरचा Preview पाहा आणि तयार झालेला Sound Sticker मित्रांना किंवा ग्रुपमध्ये पाठवा.

WhatsApp | Pinterest

स्टिकरचा आवाज आपोआप वाजणार नाही!

Sound Sticker चॅटमध्ये आल्यावर तो सुरुवातीला म्यूट असतो. त्यावर असलेल्या Audio आयकॉनवर टॅप केल्यानंतरच आवाज ऐकू येतो. त्यामुळे अचानक मोठा आवाज होण्याची शक्यता कमी होते.

WhatsApp | Pinterest

सध्या कोणाला मिळतेय ही सुविधा?

WhatsApp Sound Stickers फीचर सध्या निवडक Android बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होत आहे. सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआउटची तारीख अद्याप स्पष्ट नाही.

WhatsApp | Pinterest