Pradnya Nikam
Aprilia Tuono 457 आणि KTM 390 Duke R या दोन्ही बाईक्स परफॉर्मन्सवर भर देतात. मात्र इंजिन, राइडिंग अनुभव आणि फीचर्समध्ये दोघांची शैली वेगळी आहे.
KTM 390 Duke R ची एक्स-शोरूम किंमत ₹3.45 लाख, तर Aprilia Tuono 457 ची किंमत ₹3.99 लाख आहे. त्यामुळे KTM अजूनही स्वस्त आहे, पण दोघांमधील किंमतीचा फरक पूर्वीपेक्षा कमी झाला.
दोन्ही मॉडेल्सना नवीन LED हेडलॅम्प, अपडेटेड एक्झॉस्ट आणि फ्रेश स्टाइल मिळाली आहे. मात्र Pulsar ची ओळख ठरलेली मस्क्युलर टँक डिझाइन कायम ठेवण्यात आली आहे.
390 Duke R मध्ये 399cc सिंगल-सिलिंडर इंजिन मिळते. KTM ची खासियत म्हणजे आक्रमक परफॉर्मन्स आणि स्पोर्टी राइडिंग अनुभव. लो-एंड टॉर्कमध्ये सुधारणा झाली असली तरी शहरात वारंवार गिअर बदलण्याची गरज भासू शकते.
390 Duke R मध्ये फीचर्सची यादी मोठी आहे. Adjustable suspension, इलेक्ट्रॉनिक राइडिंग एड्स आणि कनेक्टिव्हिटीसारख्या सुविधा KTM ला टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मजबूत पर्याय बनवतात.
Aprilia मध्ये 5-इंच TFT डिस्प्ले, Bluetooth कनेक्टिव्हिटी, Turn-by-Turn Navigation, Riding Modes आणि 3-लेव्हल Traction Control मिळते. मात्र USB, TPMS आणि Quickshifter यांसारख्या काही सुविधा Accessories म्हणून घ्याव्या लागतात.
उंच रायडर्ससाठी Tuono 457 ची सीट अधिक प्रशस्त असल्याचे नमूद केले आहे. दुसरीकडे KTM ची सीट अरुंद असल्याने लांब प्रवासात काही रायडर्सना अस्वस्थता जाणवू शकते.
Smooth Twin-Cylinder Engine, आरामदायी एर्गोनॉमिक्स आणि Big-Bike Feel हवे असेल तर Tuono 457 आकर्षक ठरते. तर जास्त फीचर्स, आक्रमक राइडिंग आणि कमी किंमत प्राधान्य असेल तर KTM 390 Duke R मजबूत पर्याय आहे.