Bajaj ने Pulsar 125 आणि Pulsar 150 चे अपडेटेड मॉडेल्स भारतीय बाजारात आणले आहेत. दोन्ही बाइक्सच्या किंमतीत आणि टेक्नॉलॉजीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
Picture Credit:pinterest
नवीन Pulsar 125 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 92,990, तर Pulsar 150 ची सुरुवात 1.15 लाखांपासून होते.
Picture Credit:pinterest
दोन्ही मॉडेल्सना नवीन LED हेडलॅम्प, अपडेटेड एक्झॉस्ट आणि फ्रेश स्टाइल मिळाली आहे. मात्र Pulsar ची ओळख ठरलेली मस्क्युलर टँक डिझाइन कायम ठेवण्यात आली आहे.
Picture Credit:pinterest
नव्या Pulsar 125 आणि 150 मध्ये Diamond-type frame देण्यात आला आहे. पुढे Telescopic Fork आणि मागे Monoshock Suspension मिळते.
Picture Credit:pinterest
124.58cc इंजिन 11.8 BHP आणि 11 Nm टॉर्क तयार करते. इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
Picture Credit:pinterest
149.5cc इंजिनमधून 13.8 BHP आणि 13.7 Nm टॉर्क मिळतो. यालाही 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
Picture Credit:pinterest
नवीन Pulsar 125 आणि 150 मध्ये जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत अधिक आधुनिक फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे कम्यूटर सेगमेंटमध्ये बाईक्सची स्पर्धात्मकता वाढू शकते.
नवीन Frame, Monoshock आणि आधुनिक कनेक्टेड फीचर्समुळे Pulsar 125 आणि 150 जुन्या मॉडेल्सपेक्षा अधिक आधुनिक बनल्या आहेत. रोजच्या वापरासोबत स्पोर्टी लूक आणि टेक्नॉलॉजी हवी असेल तर ही अपडेटेड Pulsar रेंज लक्षवेधी ठरू शकते.
Picture Credit:pinterest