उपवासाच्या वेळी शेंगदाणे का खावेत? जाणून घ्या फायदे

प्राजक्ता प्रधान

दीर्घकाळ ऊर्जा

शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, फायबर आणि चांगले फॅट्स असतात, ज्यामुळे शरीराला टिकणारी ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

भूक नियंत्रणात राहणे

यातील प्रथिने आणि फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.

रक्तातील साखरेचा समतोल

शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही किंवा कमी होत नाही.

उपवासाच्या पदार्थांमध्ये सोयीस्कर

साबुदाणा खिचडी, आमटी, चिक्की किंवा भाजलेले शेंगदाणे अशा अनेक रूपांत ते सहज वापरता येतात आणि स्वस्त व सहज उपलब्ध असतात.

प्रमाण मर्यादित ठेवा

शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे अति प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो.

मीठ आणि आरोग्य समस्या

जास्त मीठ घालून खाल्ल्यास रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना धोका होऊ शकतो. तसेच अॅसिडिटी किंवा पचनाच्या समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

हृदय किती निरोगी? तुमच्या हृदयाबद्दल Smartwatch मधील Heart Health Score काय सांगतो?