Riddhi Vanne
डाळ खिचडी हलकी वाटते पण रोज जास्त खाल्ली तर तिचे पण काही तोटे होतात.
डाळ नीट भिजवली किंवा शिजवली नसेल तर पोट फुगतं, गॅस होतो आणि ज्यांना IBS चा त्रास आहे त्यांना तर जास्तच त्रास होतो.
पांढऱ्या तांदळाची खिचडी जास्त खाल्ली तर साखर पटकन वाढते, त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी जपून खावी.
Disadvantages of Eating Dal Khichdiरोज एकच साधी खिचडी खाल्ली तर शरीराला पूर्ण प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळत नाहीत आणि डाळीतल्या फायटेट्समुळे लोह, झिंक पण शोषलं जात नाही.
डाळीत प्रथिने, पोटॅशियम आणि प्युरिन जास्त असतं, त्यामुळे किडनी आणि युरिक ॲसिड असणाऱ्यांना जास्त डाळ त्रास देऊ शकते.
खिचडीत खूप तूप, तेल किंवा बटाटा टाकला तर वजन वाढतं, म्हणून डाळ-तांदूळ 30 मिनिटे भिजवून त्यात हिंग, आले, जिरे आणि भाज्या टाकूनच खिचडी बनवा.