Pradnya Nikam
बाईकवरील धूळ, चिखल आणि मळ काढण्यासाठी Pressure Washer वापरला जातो. मात्र, पाण्याचा जास्त दाब बाईकसाठी धोकादायक ठरू शकतो.
होय! पण योग्य दाब आणि अंतर ठेवणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने वापरल्यास बाईकच्या काही पार्ट्सचे नुकसान होऊ शकते.
बाईकच्या वायरिंग, कनेक्टर, स्विच, सेन्सर आणि इलेक्ट्रिकल जोडण्यांवर थेट पाण्याचा जोरदार मारा करू नका.
व्हील बेअरिंग, स्टीयरिंग बेअरिंग आणि स्विंगआर्मच्या सीलजवळ जास्त दाबाने पाणी मारल्यास पाणी आत शिरण्याची शक्यता असते.
जोरदार पाण्यामुळे चेनवरील ल्युब्रिकंट निघून जाऊ शकते. त्यामुळे बाईक धुतल्यानंतर चेन स्वच्छ करून योग्य ल्युब्रिकेशन करा.
अतिजोरदार पाण्याच्या फवाऱ्यामुळे स्टिकर्स, डेकल्स आणि आधीपासून खराब झालेल्या पेंटचे नुकसान होऊ शकते.
नोजल बाईकच्या पृष्ठभागापासून सुरक्षित अंतरावर ठेवा. एकाच ठिकाणी सतत पाण्याचा मारा करू नका. कमी दाबाचा फवारा वापरा.
– गरम इंजिनवर थंड पाणी मारू नका.
– ब्रेक डिस्कवर जोरदार फवारा मारू नका.
– एअर इनटेक आणि एक्झॉस्टमध्ये पाणी जाऊ देऊ नका.
– जवळून हाय-प्रेशर जेट वापरू नका.
शक्यतो लो-प्रेशर वॉटर स्प्रे, मायक्रोफायबर कापड आणि बाईकसाठी योग्य शॅम्पू वापरा. धुतल्यानंतर बाईक व्यवस्थित वाळवा आणि चेनला ल्युब्रिकंट लावा.