Digital Speed Gun – पोलिसांचा स्पीड गन वेग कसा मोजतो?

Pradnya Nikam

Digital Speed Gun म्हणजे काय?

Digital Speed Gun हे वाहनांचा वेग मोजण्यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. याच्या मदतीने वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची ओळख पटवता येते.

Picture Credit:pinterest

लेझर तंत्रज्ञानाचा वापर

अनेक आधुनिक Speed Gun मध्ये LiDAR म्हणजेच Laser Technology वापरली जाते. हे उपकरण वाहनाच्या दिशेने लेझर पल्स पाठवते आणि त्यांचा परत येण्याचा वेळ मोजते.

Picture Credit:pinterest

वेग कसा मोजला जातो?

लेझर किरण वाहनावर आदळून परत येतात. वेगवेगळ्या वेळांतील वाहनाचे अंतर मोजून उपकरण त्याचा वेग किती आहे, याची गणना करते.

Picture Credit:pinterest

रडार स्पीड गन कशी काम करते?

काही Speed Gun मध्ये Radar Technology वापरली जाते. यातून रेडिओ लहरी वाहनाकडे पाठवल्या जातात. परत येणाऱ्या लहरींच्या फ्रिक्वेन्सीमधील बदलावरून वाहनाचा वेग मोजला जातो. याला Doppler Effect म्हणतात.

Picture Credit:pinterest

फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग

काही आधुनिक स्पीड डिटेक्शन सिस्टीममध्ये कॅमेरा जोडलेला असतो. वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास वाहनाचा फोटो, नंबर प्लेट आणि वेगाची नोंद केली जाऊ शकते.

Picture Credit:pinterest

किती अंतरावरून वेग मोजता येतो?

हे उपकरण किती अंतरावरून वेग मोजेल, हे त्याच्या मॉडेलवर अवलंबून असते. काही लेझर स्पीड गन शेकडो मीटर अंतरावरील वाहनाचा वेग मोजू शकतात.

Picture Credit:pinterest

प्रत्येक स्पीड गन सारखी नसते!

Radar Gun आणि Laser Gun यांच्यात फरक असतो. रडार तुलनेने मोठ्या क्षेत्रातील वाहनांचा वेग मोजू शकते, तर लेझर गन विशिष्ट वाहनावर लक्ष्य केंद्रित करू शकते.

Picture Credit:pinterest

वेगमर्यादा ओलांडल्यास काय होते?

वाहनाचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास वाहतूक पोलीस नियमानुसार कारवाई करू शकतात. त्यामुळे रस्त्यावरील वेगमर्यादेचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

Picture Credit:pinterest

पुढे वाचा

TVS Apache RTR 125 की RTR 200 4V? इंजिनपासून फीचर्सपर्यंत कोण भारी?