नारायण परब
प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर असते. त्यांच्या मदतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीही असतात.
निवडणूक निर्णय अधिकारी पोस्टल बॅलेटसची मतमोजणी करतात, तर सहाय्यक अधिकारी ईव्हीएम मतमोजणीचे निरीक्षक असतात.
मतदारसंघातील उमेदवाराच्या काऊंटिंग एजंट्सकडून मतमोजणीच्या
प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाते .
सकाळी 8 वाजल्यापासून निवडणूकीची मतमोजणी केली जाते.
सर्वात आधी पोस्टल बॅलेट्सची
मतमोजणी केली जाते.
त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील
मतांची मोजणी केली जाते.
मतमोजणीच्या विविध फेऱ्या पार पडतात तसेच काही VVPAT मधील मतप्रत्रिकेचीही मोजणी होते.
मतमोजणीच्या प्रक्रियेत प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ शूटिंग होते.
.
मोबाईल लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना हॉलमध्ये परवानगी नसते.
.