प्राजक्ता प्रधान
आयुर्वेदातील नस्य उपचाराचे फायदे जाणून घ्या
सर्दी, सायनस, नाक बंद होणे आणि ॲलर्जीमुळे होणारे श्वासोच्छवासातील अडथळे कमी होण्यास मदत होते.
विशिष्ट प्रकारच्या डोकेदुखीमध्ये आराम मिळतो आणि मानसिक ताण कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.
श्वसननलिका मोकळी राहिल्यास घोरण्याची समस्या कमी होऊ शकते.
केसांची मुळे मजबूत होण्यास, केस गळणे व अकाली पांढरे होणे कमी होण्यास तसेच चेहऱ्याची चमक टिकवण्यास फायदा होतो
डोळे, कान, घसा आणि मेंदूच्या कार्याला पोषण मिळून स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
अणुतेल, षडबिंदू तेल किंवा गाईचे तूप यांसारखे कोणतेही औषध वापरण्यापूर्वी तुमचे प्रकृतीमान आणि लक्षणे लक्षात घेऊन आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.