लहान मुलांना बाईकवर नेताना पालकांनी ही चूक टाळावी! पाय अडकण्यापासून हेल्मेटपर्यंत जाणून घ्या Safety Rules

Pradnya Nikam

मुलांना बाईकवर कुठे बसवावे?

लहान मुलांना बाईकच्या पुढे टाकीवर बसवणे टाळा. त्यांना मागील सीटवर योग्य पद्धतीने बसवा. बाईकवर चालकासह फक्त एकच प्रवासी असावा.

Child Bike Safety | pinterest

पाय अडकण्याचा धोका ओळखा!

बाईकच्या मागील चाकाजवळ किंवा चेनजवळ मुलांचे पाय जाऊ देऊ नका. पाय ठेवण्यासाठी योग्य फुटरेस्ट आणि सुरक्षित गार्ड असल्याची खात्री करा.

Child Bike Safety | pinterest

लहान मुलांसाठी Safety Harness महत्त्वाचे

9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांना बाईकवर नेताना नियमांनुसार Safety Harness वापरणे आवश्यक आहे. यामुळे मुलाचे शरीर चालकाला सुरक्षितपणे जोडले जाते.

Child Bike Safety | pinterest

मुलांसाठी वेगळे हेल्मेट असावे!

मुलाच्या डोक्याला योग्य आकाराचे हेल्मेट घाला. हेल्मेट डोक्यावर सैल नसावे आणि त्याचा पट्टा व्यवस्थित लॉक केलेला असावा.

Child Bike Safety | pinterest

वेगावर नियंत्रण ठेवा

4 वर्षांपर्यंतच्या मुलांना बाईकवर नेताना वेग 40 किमी प्रतितासपेक्षा जास्त नसावा. शक्यतो कमी वेगात आणि शांत रस्त्यावर प्रवास करा.

Child Bike Safety | pinterest

मुलांचे कपडेही ठरतात महत्त्वाचे!

लांब ओढणी, स्कार्फ किंवा सैल कपडे बाईकच्या चाकात किंवा चेनमध्ये अडकू शकतात. प्रवासापूर्वी कपडे व्यवस्थित आहेत का ते तपासा.

Child Bike Safety | pinterest

मुलाला झोप येत असेल तर बाईकवर नेऊ नका

लहान मुलांना प्रवासात झोप येऊ शकते. अशावेळी त्यांचे शरीर पुढे किंवा बाजूला झुकण्याचा धोका असतो. मुलाला जागे ठेवणे आणि त्याची स्थिती सतत तपासणे आवश्यक आहे.

Child Bike Safety | pinterest

मुलांची सुरक्षा, पालकांची जबाबदारी!

हेल्मेट, Safety Harness, योग्य बसण्याची पद्धत आणि कमी वेग या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांसोबतचा प्रत्येक प्रवास सुरक्षित बनवा.

Child Bike Safety | pinterest