टायरचं Pressure उन्हात वाढतं? बाईकमधील या टेक्नॉलॉजीचं काम जाणून घ्या

Pradnya Nikam

टायरमधील हवा गरम होते?

उन्हामुळे टायर आणि त्यातील हवा गरम होऊ शकते. तापमान वाढल्यावर टायरमधील हवेचा Pressure देखील वाढू शकतो.

Picture Credit: pinterest

मग Pressure किती वाढतं?

Pressure किती वाढेल हे बाहेरील तापमान, टायरचं तापमान, सुरुवातीचा Pressure आणि रायडिंगवर अवलंबून असतं. प्रत्येक वेळी वाढ सारखीच नसते.

Picture Credit: pinterest

TPMS म्हणजे काय?

TPMS म्हणजे Tyre Pressure Monitoring System. हे Sensor टायरमधील हवेचा Pressure मोजून तो स्क्रीनवर दाखवतं. काही सिस्टम तापमानही दाखवतात.

Picture Credit: pinterest

उन्हात पार्क केल्यावर काय दिसेल?

टायर गरम झाल्यामुळे TPMS वर Pressure वाढलेलं दिसू शकतं. मात्र हा बदल म्हणजे टायरमध्ये जास्त हवा भरली गेली, असं नाही.

Picture Credit: pinterest

रायडिंगनंतर Pressure वाढतं?

हो! बाईक चालवल्यावर टायरमध्ये उष्णता निर्माण होते आणि Pressure वाढू शकतं. त्यामुळे गरम टायरमधील Reading थंड टायरच्या Reading पेक्षा वेगळी असू शकते.

Picture Credit: pinterest

हवा कधी तपासावी?

टायर थंड असताना Pressure तपासणं योग्य. बाईक काही तास चालवलेली नसावी आणि थेट उन्हामुळे टायर खूप गरम झालेला नसावा.

Picture Credit: pinterest

गरम टायरमधील हवा काढावी का?

नाही! फक्त गरम झाल्यामुळे Pressure वाढलं म्हणून हवा सोडू नका. टायर थंड झाल्यावर पुन्हा तपासा आणि कंपनीने सांगितलेल्या Pressure शी तुलना करा.

Picture Credit: pinterest

TPMS खरंच उपयोगी आहे?

TPMS मुळे टायरमधील Pressure कमी झाल्याचं लवकर लक्षात येऊ शकतं. मात्र योग्य Pressure साठी बाईकच्या मॅन्युअलमधील किंवा स्टिकरवरील शिफारस पाळा. TPMS हे नियमित तपासणीला पर्याय नाही.

Picture Credit: pinterest

पुढे वाचा

Triumph Bonneville T40 vs Honda CB350C; कोणती Bike ठरेल फायदेशीर?