Highway वर कोण मारणार बाजी? Triumph Bonneville T40 की Honda CB350C?

Automobile

09 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Triumph Bonneville T40 मध्ये क्लासिक ब्रिटिश Roadster लूक, टिअरड्रॉप फ्युएल टँक आणि स्पोक व्हील्स मिळतात. तर Honda CB350C ला लांब बॉडी आणि रुंद Cruiser स्टाइल देण्यात आली आहे.

लूकमध्ये कोण पुढे?

Picture Credit: triumphmotorcycles

 Triumph Bonneville T40: 349cc इंजिन, 29 PS पॉवर आणि 31.2 Nm टॉर्क.  Honda CB350C: 348.36cc इंजिन, 21.07 PS पॉवर आणि 29.5 Nm टॉर्क. जास्त पॉवरमुळे हायवेवर वेग वाढवताना Triumph ला कागदोपत्री आघाडी मिळते.

Engine मध्ये कोण दमदार?

Picture Credit: honda2wheelersindia

Triumph Bonneville T40 मध्ये 6-Speed Gearbox आहे, तर Honda CB350C मध्ये 5-Speed Gearbox मिळतो. लांबच्या प्रवासात वेगानुसार गिअर निवडण्याची अधिक लवचिकता Triumph मध्ये मिळू शकते.

Gearbox मध्ये कोणाचा फायदा?

Picture Credit: triumphmotorcycles

Triumph T40 मध्ये Cruise Control, 4-इंच कलर TFT डिस्प्ले, नेव्हिगेशन आणि 5 Riding Modes मिळतात. Honda CB350C मध्ये Bluetooth कनेक्टिव्हिटी, USB चार्जिंग पोर्ट आणि डिजिटल-ॲनालॉग कन्सोल आहे.लांबच्या Highway Ride साठी आधुनिक फीचर्स हवे असतील, तर Triumph अधिक आकर्षक पर्याय ठरते.

Cruise Control कोणात?

Picture Credit: honda2wheelersindia

Honda CB350C: 186 किलो वजन, 15.2 लिटर टँक.  Triumph Bonneville T40: 195 किलो वजन, 14.5 लिटर टँक. Honda चे वजन कमी आणि टँक मोठा आहे. त्यामुळे कमी वजनाची बाइक आणि तुलनेने जास्त इंधन क्षमता पसंत करणाऱ्यांसाठी ती विचारात घेण्यासारखी आहे.

वजन आणि Fuel Tank

Picture Credit: triumphmotorcycles

– Honda CB350C: अंदाजे ₹2 लाखांपासून. – Triumph Bonneville T40: ₹2.55 लाखांपासून.

किंमतीत किती फरक?

Picture Credit: honda2wheelersindia

जास्त पॉवर, 6-Speed Gearbox, Cruise Control आणि आधुनिक राइडिंग फीचर्स यांना प्राधान्य देत असाल, तर Triumph Bonneville T40 तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.

Highway साठी कोणती योग्य?

Picture Credit: triumphmotorcycles

Honda CB350C कमी किंमत, हलके वजन आणि मोठ्या फ्युएल टँकमुळे आकर्षित करते. शांतपणे लांबचा प्रवास करायचा आणि खरेदीचा खर्च नियंत्रणात ठेवायचा असेल, तर Honda चा विचार करा.

Honda कोणासाठी बेस्ट?

Picture Credit: honda2wheelersindia