घरीच झटपट बनवा हॉटेल सारखा खुसखुशीत सामोसा

नुपूर भगत

स्ट्रीट फूड

समोसा हे सर्वांचे आवडते स्ट्रीट फूड आहे. तुम्ही घरीदेखील हा पदार्थ काही मिनिटांतच तयार करु शकता

मैदा

यासाठी प्रथम मैद्यात हलके मीठ आणि ओवा घालून घट्ट पीठ मळून घ्या

बटाटे

स्टफींगसाठी बटाटे उकडून, सोलुन, मॅश करुन घ्या

तेल

आता एका कढईत तेल टाकून यात आलं-लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, मटार टाका आणि परतून घ्या

मसाले

मग यात मीठ, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि मॅश केलेले बटाटे टाका आणि साहित्य परता आणि गॅस बंद करा

पुऱ्या

यानंतर तयार पीठाच्या पुऱ्या लाटून घ्या आणि मधून कापून यांचे दोन तुकडे करा

समोसा

आता एक तुकडा घ्या, याचा कोन बनवा आणि यात तयार स्टफींग भरुन समोसा तयार करा

तळा

आता गरम तेलात हे समोसे मंद आचेवर छान तळून घ्या

सर्व्ह करा

तयार सामोसे सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

बातमीसाठी इथे क्लिक करा

अंगाला हळद लावल्यांनंतर वर-वधूला घराबाहेर का पाठवत नाहीत?