Royal Enfield Shotgun 650 चे खास Edition लाँच झाली असून भारताला केवळ २५ बाइक्स मिळणार आहेत.
Picture Credit: royalenfield Instagram
Rough Crafts सोबत मिळून Shotgun 650 चे विशेष लिमिटेड एडिशन तयार केले आहे. या मॉडेलची रचना'Caliber Royale' या कस्टम बाईकवरून घेण्यात आली.
जगभरात केवळ 100 क्रमांकित बाइक्स तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी फक्त २५ बाइक्स भारतासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
Gloss Jet Black आणि Matte Stealth Black रंगसंगती, हाताने तयार केलेल्या गोल्ड स्ट्राइप्स, ब्रास बॅज, फ्युएल टँक आणि प्रीमियम फिनिशमुळे ही बाईक स्टँडर्ड Shotgun 650 पेक्षा वेगळी दिसते.
या लिमिटेड एडिशनमध्ये 648cc पॅरलल-ट्विन इंजिन कायम ठेवण्यात आले. म्हणजेच परफॉर्मन्समध्ये कोणताही बदल नसून खास डिझाइन आणि एक्सक्लुझिव्ह लूक हेच त्याचे मुख्य आकर्षण आहे.
Royal Enfield Shotgun 650 Rough Crafts Edition ची एक्स-शोरूम किंमत ₹5.75 लाख ठेवण्यात आली आहे. ही किंमत स्टँडर्ड मॉडेलपेक्षा लक्षणीय जास्त आहे.
या बाईकची विक्री Royal Enfield च्या 'Drop' पद्धतीने केली जाणार आहे. भारतातील ग्राहकांसाठी बुकिंग 30 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
ही बाईक रोजच्या वापरासाठी नसून कलेक्टर्स आणि Royal Enfield चाहत्यांसाठी खास तयार करण्यात आली आहे.