100cc, 125cc आणि 150cc या तीन सेगमेंटमध्ये अनेक पर्याय आहेत. पण रोजच्या वापरासाठी नेमकी कोणती बाईक योग्य ठरेल?
Picture Credit: pinterest
रोज 20-40 किमी प्रवास करणाऱ्यांसाठी 100cc बाइक उत्तम पर्याय आहे. कमी देखभाल खर्च आणि उत्कृष्ट मायलेज हे तिचे मोठे प्लस पॉइंट आहेत.
100cc पेक्षा चांगली पॉवर आणि 150cc पेक्षा अधिक मायलेज हवे असेल, तर 125cc सेगमेंट सर्वात संतुलित पर्याय ठरतो.
लांब पल्ल्याचा प्रवास, हायवे रायडिंग आणि स्पोर्टी अनुभव हवा असेल, तर 150cc बाइक अधिक योग्य ठरते.
100cc बाइक्सचा देखभाल खर्च सर्वात कमी असतो. 125cc मध्ये तो थोडा वाढतो, तर 150cc बाइक्ससाठी सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्सवर अधिक खर्च होऊ शकतो.
100cc बाइक्स सर्वाधिक इंधन बचत करतात. 125cc बाइक्स चांगला समतोल राखतात, तर 150cc बाइक्समध्ये पॉवर जास्त असल्याने मायलेज तुलनेने कमी असू शकते.
100cc: ऑफिस, कॉलेज आणि शहरातील दैनंदिन वापर. 125cc: शहर + अधूनमधून हायवे. 150cc: लांब प्रवास आणि परफॉर्मन्स पसंत करणाऱ्यांसाठी.
100cc: Hero HF Deluxe, Honda Shine 100, TVS Sport 125cc: TVS Raider 125, Honda CB125 Hornet, Hero Xtreme 125R 150cc: Yamaha FZ-S Fi, Bajaj Pulsar N150, Hero Xtreme 160R
जर तुमचे प्राधान्य मायलेज असेल तर 100cc, मायलेज आणि पॉवरचा समतोल हवा असेल तर 125cc, आणि परफॉर्मन्स महत्त्वाचा असेल तर 150cc बाइक तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.