22Km मायलेज आणि 172Km टॉप स्पीड! दमदार Honda SUV ची प्री-बुकिंग सुरु

Automobile

22 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

प्रिमियम SUV ची दमदार एन्ट्री

भारतीय बाजारपेठेत सिटी फेसलिफ्ट लाँच सोबत होंडाने आपली प्रिमियम SUV होंडा ZR-V देखील आणली आहे. 

Picture Credit: Pinterest

लवकरच लाँच

ही कार लवकरच भारतात उपलब्ध होईल. ती CBU स्वरुपात भारतात आयात केली जाईल. कंपनीने लाँचची डेट अद्याप सांगितलेली नाही.

Picture Credit: Pinterest

SUV जुलैमध्ये होईल उपलब्ध

ही कार सध्या प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असून तिची डिलिव्हरी जुलै २०२६ मध्ये सुरु होईल. ही कार बायब्रीड इंजिनसह येईल.

Picture Credit: Pinterest

या ड्युअल - मोटर स्ट्राँग हायब्रीड सिस्टीमसह जोडलेले २.० लिटर पेट्रोल इंजिन असेल, जे १८४ एचपी आणि ३१५ एनएम टॉर्क निर्माण करेल.

इंजिन आणि पॉवर

Picture Credit: Pinterest

ही कार अवघ्या ८ सेकंदात ० ते १०० किमी/ तास वेग पकडते आणि तिचा सर्वाधिक वेग १७२ किमी/ तास आहे. 

सर्वाधिक वेग किती आहे?

Picture Credit: Pinterest

ही प्रिमियम SUV २२.७९ किमी प्रति लिटरचे मायलेज देईल. या कारमध्ये जागतिक SUV स्टायलिंग आणि आकर्षक डिझाइन असेल.

मायलेज

\Picture Credit: Pinterest

एल-आकाराच्या डीआरएलसह पूर्ण एलईडी हेडलाईट्स असतील. तसेच या कारमध्ये काळी ग्रिल, एअर व्हेंट्स असलेला फ्रंट बंपर आणि काळ्या रंगाचा खालचा भाग असेल.

डिझाईन

Picture Credit: Pinterest

या कारमध्ये १८ इंची अलॉय व्हील्स असतील आणि आजकाल बहुतेक गाड्यांमध्ये सामान्यपणे आढळणारे कनेक्टेड टेललाइट्स यामध्ये नसतील.

अलॉय आणि टेलगेट

Picture Credit: Pinterest

होंडा ZR-V ची लांबी ४५६७ मिमी, रुंदी १८४० मिमी आणि उंची १६२१ मिमी आहे. व्हीलबेस २६५५ मिमी असून १३१३ लिटरची बूट स्पेस मिळते.

डायमेंशन

Picture Credit: Pinterest

तुमची Car Hack होऊ शकते? Cybersecurity चा वाढता धोका