Nissan Pixo ही A-Segment इलेक्ट्रिक कार आहे. युरोपियन शहरांमधील दैनंदिन ड्रायव्हिंग लक्षात घेऊन तिची निर्मिती करण्यात आली आहे.
Picture Credit:nissan
Pixo मध्ये Cube-inspired बॉडी, Pixel-inspired LED लाइट्स आणि ‘Robot Face’ स्टाइल फ्रंट डिझाइन मिळते. 18-इंच अलॉय व्हील्सही तिचा लूक वेगळा करतात.
Picture Credit:nissan
Pixoची लांबी 3,796mm आणि रुंदी 1,790mm आहे. कारमध्ये 4 प्रौढ व्यक्ती बसू शकतात. Rear Seats स्लाइड करता येत असल्याने गरजेनुसार जागा बदलता येते.
Picture Credit:nissan
Nissan Pixo मध्ये 27.5kWh LFP Battery देण्यात आली आहे. कंपनीनुसार ही कार एका चार्जमध्ये 259km WLTP Range देते.
Picture Credit:nissan
Pixoमध्ये Single Electric Motor आहे. मोटरची क्षमता 82hp आहे; मात्र Torque आणि Performanceचे पूर्ण आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत.
Picture Credit:nissan
50kW DC Fast Chargingच्या मदतीने Pixoची Battery 15 ते 80% सुमारे 28 मिनिटांत चार्ज करता येते. 11kW Bi-directional AC Chargingचाही पर्याय आहे.
Picture Credit:nissan
Pixoमध्ये 10-इंच Touchscreen, Google Built-in आणि Google Gemini मिळणार आहे. MyNissan App आणि Driver-specific settingsसाठी Face ID सारखी टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे.
Picture Credit:nissan
Adaptive Cruise Control, Lane Departure Warning आणि Hands-Free Parking यांसारखी Advanced Driver Assistance Systems Pixoमध्ये उपलब्ध असतील.
Picture Credit:nissan
Nissan Pixo सध्या युरोपियन मार्केटसाठी विकसित करण्यात आली आहे. युरोपमध्ये ग्राहकांना तिची डिलिव्हरी 2027च्या सुरुवातीला सुरू होणार आहे. किंमत डिसेंबरमध्ये जाहीर होणार आहे. भारतातील लॉन्चबाबत सध्या अधिकृत घोषणा झालेली नाही.
Picture Credit:nissan