डोळ्यांखाली काळी वर्तुळं जमा होणं हे जरी सामान्य असलं तरीही त्याकडे दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही
Picture Credit: iStock
तुम्ही रोज व्यवस्थित झोपत नसाल तर डोळ्याची त्वचा पातळ होते. यामुळे नसा दिसू लागतात आणि डोळे काळे पडतात
शारीरिक आणि मानसिक तणावामुळे चेहऱ्यावरील चार्म निघून जातो आणि डोळ्यांखाली डार्क सर्कल तयार होऊ लागतात
तुमच्या कुटुंबात कोणाला डार्क सर्कल असतील तर तुम्हालाही ही समस्या उद्भवू शकते, हे संपूर्णतः थांबवता येणे शक्य नाहीये
शरीरात पाणी कमी जात असेल तर त्वचा सुकते आणि डोळ्यांखालील त्वचा यामुळे लवकर प्रभावित होते, ज्यामुळे काळे डाग दिसतात
लॅपटॉप, मोबाईल स्क्रिन सतत बघत असाल तर त्याचा डोळ्यांवर दबाव येतो आणि ब्लड सर्क्युलेशन बिघडून डार्क सर्कल्स दिसू लागतात
त्वचेवर सतत खाज येत असेल तर डोळे रगडले जातात यामुळे स्किन डॅमेज होते आणि डार्क सर्कल होण्यास कारणीभूत ठरते
भरपूर झोपा, पाणी प्या, तणाव कमी करा आणि स्क्रिन टाइम कमी करा. थंड पट्टी, गुलाबपाणी, काकडी डोळ्यांना आराम देते
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही