लिंबू आणि तुळस एकत्र करून पाणी पिण्याने शरीराला कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात याबाबत अधिक माहिती घेऊ
Picture Credit: iStock
तुळस प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते आणि लिंबातील विटामिन सी देखील इम्युनिटी वाढवते. आजारांशी दोन हात करण्यास मदत मिळते
तुळस-लिंबाचे पाणी हे पोटातील समस्या अर्थात गॅस, अपचन, अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून सुटका मिळवून देते. पचन चांगले होते
सकाळी रिकाम्या पोटी तुळस लिंबू पाणी पिण्याने मेटाबॉलिजम वाढते. शरीराची कॅलरी लवकर कमी होऊन वेट लॉस होतो
लिंबू त्वचेची चमक वाढवते आणि तुळस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकते. नियमित तुळस लिंबू पाणी पिण्याने त्वचा अधिक चमकदार होते
तुळशीत अँटीबॅक्टेरियल घटक असल्याने तोंडातील बॅक्टेरिया मरून जातात आणि लिंबामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होते
तुळशीचा सुगंध आपले डोके अधिक शांत करते. लिंबाच्या सुगंधाने मूड फ्रेश होतो. या दोन्ही पदार्थांमुळे ताणव आणि थकवा निघून जातो
5-6 तुळशीची पाने उकळून घ्या. पाणी कोमट झाल्यावर त्यात लिंबाचा रस पिळा. सकाळी उपाशीपोटी हे पाणी पिण्याने फायदा मिळतो
तुळस आणि लिंबाच्या पाण्याचा केवळ हेल्दी फायदा नाही तर हे एक नैसर्गिक टॉनिकदेखील आहे
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही