उपवासाचे ७ पदार्थ घरी नक्की बनवून खा

Life style

27 September, 2025

Author:  नुपूर भगत

भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा व शेंगदाणा पावडर टाकून परतून घ्या आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.

साबुदाणा खिचडी

Picture Credit: Pinterest

राजगिरा पीठ, बटाटा, मिरची व मीठ घालून गोळा बनवून थापायचं. तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूंनी शेकून गरम सर्व्ह करायचं.

राजगिरा थालिपीठ

Picture Credit: Pinterest

साबुदाणा, बटाटा, शेंगदाणा पावडर एकत्र करून गोळे बनवायचे. तेलात सोनेरी होईपर्यंत तळून दह्यासोबत खायचे. काढा.

 साबुदाणा वडा

Picture Credit: Pinterest

वरई तांदूळ शिजवून जिरं-मिरचीच्या फोडणीमध्ये परतायचा. शेंगदाणा पावडर व तुपासोबत खाल्ला की स्वादिष्ट लागतो.

 वरईचा भात

Picture Credit: Pinterest

उकडलेले बटाटे, मिरची व शेंगदाणा पावडर घालून टिक्की बनवायची. तव्यावर शेकून दही किंवा चटणीसोबत खायची.

फराळी पॅटीस

Picture Credit: Pinterest

राजगिरा/सामा पीठ तुपात भाजून त्यात साखर-पाणी मिसळायचं. ड्रायफ्रुट्स व वेलची पूड टाकून गोड शिरा तयार करायचा.

उपवासाचा शिरा

Picture Credit: Pinterest

दुधात भिजवलेला साबुदाणा, साखर व वेलची टाकून शिजवायचा. बदाम-काजू घालून थंड किंवा गरम खीर खायची.

 साबुदाणा खीर

Picture Credit: Pinterest