www.navarashtra.com

Published Feb 12,  2025

By  Shubhangi Mere

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ १९ फेब्रुवारीपासून होणार आहे.

Pic Credit -  Social Media

१८ वर्षीय अफगाणिस्तानचा अल्लाह गझनफर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर पडला आहे. फ्रॅक्चरमुळे तो ही स्पर्धा खेळू शकणार नाही.

अल्लाह गझनफर

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो ही स्पर्धा खेळू शकणार नाही.

मिचेल मार्श

भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने बुमराहच्या फिटनेसबद्दल अपडेट दिले आहेत.

जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियन संघाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स देखील चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग असणार नाही, दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला आहे.

पॅट कमिन्स

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अँरिक नोर्किया २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याला  संघात समाविष्ट करण्यात आले होते परंतु पाठीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला.

अँरिक नोर्किया

मिचेल स्टार्क देखील २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली की स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे.

मिचेल स्टार्क

युवा पाकिस्तानी सलामीवीर सैम अयुबला घोट्याच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी निवडण्यात आलेल्या १५ जणांच्या संघात निवडण्यात आलेली नाही.

सैम अयुब

२१ वर्षीय जेकब बेथेललाही २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर काढण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला दुखापत झाली होती.

जेकब बेथेल

ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणार नाही, तो कंबरेला झालेल्या दुखापतीने त्रस्त आहे.

जोश हेझलवूड

केशर दूध पिण्याचे काय आहेत 7 फायदे