Royal Enfield ची नवी Himalayan 750 चर्चेत आहे. यात 750cc इंजिन असून ते 55 PS पॉवर आणि 63 Nm टॉर्क देते. 6-स्पीड गिअरबॉक्स, अॅडजस्टेबल सस्पेंशन आणि स्पोक-अॅलॉय असे दोन पर्याय मिळतील. भारतात Motoverse 2026 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit:royalenfield
कॅफे रेसर लूक आवडणाऱ्यांसाठी Continental GT 750 खास ठरू शकते. यात नवीन 750cc इंजिन, फ्रंट ट्विन डिस्क ब्रेक आणि अॅडजस्टेबल फोर्क मिळण्याची शक्यता आहे. स्टँडर्ड आणि फेअर्ड अशा दोन व्हेरिएंटमध्ये ती येऊ शकते. भारतात 2027 च्या पहिल्या सहामाहीत लाँच अपेक्षित आहे.
Picture Credit:royalenfield
Royal Enfield ची Flying Flea S6 ही इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलर स्टाइलमध्ये सादर झाली आहे. लांब सस्पेंशन ट्रॅव्हल, ड्युअल पर्पज टायर्स आणि ऑफ-रोड मोड ही तिची वैशिष्ट्ये आहेत. Flying Flea C6 प्रमाणेच बॅटरी आणि मोटर मिळण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit:royalenfield
Hero ची नवीन Xpulse 450 अॅडव्हेंचर रायडिंगसाठी सज्ज आहे. यात 421cc लिक्विड-कूल्ड इंजिन असून 46 PS पॉवर आणि 38 Nm टॉर्क मिळतो. क्रूझ कंट्रोल, क्विकशिफ्टर, Apple CarPlay आणि Android Auto यांसारखी फीचर्सही मिळतील. भारतात 2027 मध्ये येण्याची शक्यता आहे.
Picture Credit:pinterest
Vida UBX 06 ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट बाईक सुपरमोटो डिझाइनसह सादर झाली आहे. 17-इंच व्हील्स, गोल्डन इन्व्हर्टेड फोर्क, दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनल ABS अशी वैशिष्ट्ये आहेत. 2027 मध्ये प्रॉडक्शन मॉडेल येण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit:pinterest
Norton 450 Urban ही नवीन रोडस्टर बाईक आहे. यात 454cc इंजिन असून 47 PS पॉवर आणि 45 Nm टॉर्क मिळतो. 8-इंच TFT टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, कीलेस इग्निशन, क्विकशिफ्टर आणि TPMS यांसारखी फीचर्स मिळतील. भारतात 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत येण्याची शक्यता आहे.
Picture Credit:pinterest
इटालियन कंपनी Italjet ने Dragster रेंजमधील 300, 459 आणि 700 हे तीन स्कूटर्स सादर केले आहेत. Motohaus च्या माध्यमातून भारतात एंट्री होणार आहे. कोल्हापूरमधील प्लांटमध्ये त्यांची स्थानिक असेंब्ली केली जाणार आहे. डिसेंबर 2026 मध्ये India Bike Week येथे पदार्पण अपेक्षित आहे.
Picture Credit:pinterest
या प्रदर्शनात आणखी काही दमदार बाईक्स पाहायला मिळाल्या. – Harley-Davidson X350T: 350cc इंजिन, 22 PS पॉवर आणि 30 Nm टॉर्क. – BMW F 450 R आणि F 450 RR: 420cc पॅरलल-ट्विन इंजिन, 48 PS पॉवर. – Moto Guzzi Trip 500: 457cc इंजिन, 47.6 PS पॉवर आणि 43.5 Nm टॉर्क.
Picture Credit:pinterest