आवळा नवमीला झाडाखाली भोजन करण्याचे कारण काय?

Lifestyle

16 November 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आवळा नवमी किंवा अक्षय नवमी म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याच्या सावलीत भोजन करण्याची परंपरा आहे.

आवळा नवमीचे महत्त्व

Picture Credit: Pinterest

आवळ्याच्या  झाडात विष्णूंचा वास

Picture Credit: Pinterest

धार्मिक मान्यतेनुसार, आवळ्याच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने विष्णूंची कृपा मिळते, अशी श्रद्धा आहे.

झाडाखाली भोजन करण्याची परंपरा

Picture Credit: Pinterest

आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करण्याची प्रथा आहे. या परंपरेला ‘अक्षय भोजन’ असेही म्हटले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे.

अन्नदानाला विशेष महत्त्व

Picture Credit: Pinterest

या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करणे शुभ मानले जाते. आवळ्याच्या झाडाखाली कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत भोजन करून आनंद वाटण्याचीही परंपरा आहे.

आवळ्याच्या झाडाची पूजा

Picture Credit: Pinterest

या दिवशी झाडाला पाणी अर्पण केले जाते. हळद-कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. काही ठिकाणी झाडाभोवती प्रदक्षिणाही घातल्या जातात.

आवळा आणि आरोग्याचे नाते

Picture Credit: Pinterest

आवळा हा व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत आहे. त्यामुळे भारतीय परंपरेत आवळ्याला आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व दिले गेले आहे.

निसर्गाप्रती कृतज्ञता

Picture Credit: Pinterest

आवळा नवमीच्या परंपरेतून वृक्षपूजा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. झाडांचे महत्त्व समजून घेणे आणि त्यांचे संवर्धन करणे, हा या परंपरेतून मिळणारा संदेश आहे.

सुख समृद्धीसाठी प्रार्थना

Picture Credit: Pinterest

आवळा नवमीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून कुटुंबाच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले दान-पुण्य अक्षय फळ देणारे मानले जाते.